आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
सातारा – साताऱ्यातील वाई एसटी बस स्थानकात एक दुर्दैवी घटना घडली आहे.7 वी इयत्ते तील शाळकरी मुलीचा एसटी बस खाली सापडून मृत्यू झाला आहे.श्रावणी अहिवळे असे त्या विद्यार्थीनीचे नाव असून शाळा सुटल्यावर गर्दीमुळे धक्का लागल्यामुळे ती चाकाखाली चिरडली गेली आहे. मृत श्रावणी ही वाई तालूक्यातील सुलतानपुरची होती.या बस स्थानकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी होत असते त्यामुळे या ठिकाणी कायम स्वरुपी पोलिस कर्मचारी नेमला जावा अशी मागणी होते आहे