वाई प्रतिनिधी
फुलेनगर मध्ये दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी तेजस दादा जमदाडे याच्या नेतृत्वाखाली दुर्गामाता दौडचे जोरदार स्वागत करण्यात आले. पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा संकट येते, जेंव्हा जेंव्हा म्लेंच्छाची गर्दी होते तेंव्हा तेंव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या
नावाने संभाजी राव भिडे गुरुजींनी सुरु केलेली हि दौड म्हणजे हिंदूधर्म रक्षितेच प्रतिक, शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा, आणि झोपलेल्या हिंदूला
खडबडून जागे करण्याची धमक या दौडमध्ये दिसते.
आई जगदंबेचा उदो उदो
आई भवानी मातेचा उदो उदो
आई दार उघड आई दार उघड
|| पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज !!
ll पुण्यश्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज !! अशा गर्जना देत महात्मा जोतिबा फुले स्मारकला वंदन करून फटाक्यांच्या अतिशबाजी सह पुष्प वर्षा करून स्वागत केले. पूर्ण वाई विभागाने आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वाई यांनी फुलेनगर नागरिकांचे कौतुक केले इतका सूंदर नियोजन पूर्ण भाग भगवा दिसत होता. भक्तिमय झालेला दिसत होता लहान, थोर, महिला सुद्धा पहाटे 6 वाजता स्वागत पूजन साठी उपस्तिथ होत्या.