धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
भोर बस स्थानकात ७०.००० रुपये किंमतीचे मंगळसूत्राची चोरी .
भोर एसटी बस स्थानकात शनिवार दि.२१ बसमध्ये चढत असताना शोभा नंदकुमार गायकवाड रा. शिरवळ ता.खंडाळा या महिलेचे २० ते २२ ग्रामचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून लंपास केल्याची घटना घडली.याची फिर्याद भोर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शोभा गायकवाड भोरवरून शिरवळ येथे जात असताना भोर बस स्थानकात अज्ञाताने २० ते २२ ग्रॅम सोन्याच्या चैनमध्ये ओवलेले दोन वाट्यांचे मंगळसूत्र ७० हजार रुपये किमतीचे चोरण्याची घटना घडली.प्रवासादरम्यान भोर – शिरवळ मार्गावरील वडगाव ता.भोर येथे गेल्यानंतर शोभा यांच्या मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी भोर पोलिसात तक्रार दिली.पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धर्मवीर खांडे,राहुल मखरे करीत आहेत. भोर बस स्थानकातील सिसीटीव्ही कॅमेरे बंद भोर बसस्थानक सोयी सुविधांविना असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.यातच नवीन भर पडून बस स्थानकात चोरीच्या घटना होत आहेत.याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत फार महत्त्वाची असली तरी बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोर शोधणे कठीण होत आहे.