धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
कोर्ले येथे विहीरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदान .
भोर तालुक्यातील पश्चिम भागात हिरवेगार डोंगराच्या कुशीत असलेल्या कोर्ले गावातील ग्रामदेवी जननी देवी मंदिरासमोरील ग्रामपंचायत च्या विहिरी मध्ये पाण्याच्या शोधात कोल्हा पाण्यात पडला असे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी कोल्हा विहिरीत पडल्याची माहिती भोर वनविभागाला कळविण्यात आली तसेच माहिती मिळताच क्षणी भोर वनविभागातील कर्मचारी , अधिकारी , रेस्क्यू पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली . वनविभाग भोर येथील रेस्क्यू पथकाने पाण्यात पडलेल्या कोल्ह्याला सुखरूप जाळीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले, बचाव कार्यात वनविभागाचे अधिकारी शिवाजी राऊत साहेब वनपरीक्षेत्र अधिकारी तसेच एस आर खट्टे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळे के एम हिमोने वनरक्षक यांच्या योग्य नियोजन करण्यात आले. सोबत वन कर्मचारी तानाजी दुधाने, बाळू पारठे, विकास कांबळे , वडतुंबी गावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश निगडे , अविनाश मांढरे यांच्या द्वारे कोल्ह्याला बाहेर काढण्यात यश आले . नंतर कोल्हाला काही जखम , इजा झाली नसल्याची खात्री झाल्यानंतर कोल्ह्याला सुरक्षित ठिकाणी सोडून दिले .