धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
ध्रुव प्रतिष्ठान यांच्या वतीने रेस्क्यू टीम शिरगाव यांना रेस्क्यू साहित्य वाटप
वरंधा घाट परिसरामध्ये सातत्याने अपघात होत आहेत. त्या भागामध्ये अपघात घडल्यानंतर मदतीसाठी पथक पोहोचण्यासाठी याला वेळ लागतो. आणि वेळेत मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तींच्या जीवावर बेतू शकते. आणि याचमुळे तातडीने मदत मिळावी यासाठी ध्रुव प्रतिष्ठान टिटेघर अध्यक्ष राजीव केळकर यांच्या वतीने व भोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शंकर पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून दुर्गम व डोंगरी खोऱ्यातील तरुणांना भोर सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मार्गदर्शनाखाली ध्रुव प्रतिष्ठांचे हितचिंतक मार्गदर्शक, व उत्तम ट्रेकर्स कै. अशोक रामचंद्र कित्तूर यांच्या प्रथम स्फूर्ती दिनानिमित्त रेस्क्यू टीम साठी रेस्क्यू साहित्य प्रदान करण्यात करण्यात आले. आज शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११ वाजता. भोर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये सन्माननीय शंकर पाटील पोलीस निरीक्षक भोर पोलीस स्टेशन यांच्या शुभहस्ते रेस्क्यू टीम शिरगाव वरंधा घाट यांना लाइफ जॅकेट , टॉर्च, रोप ,हेल्मेट ,स्ट्रेचर, ट्रॅकिंग शूज व इतर साहित्य असे एकूण १ लाख ३६.००० हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले सदर रेस्क्यूट टीम शिरगाव मधील सदस्य अक्षय शशिकांत, धुमाळ ,दत्तात्रय मारुती पोळ, आप्पाजी शिवराम पोळ, दत्ता दगडू पोळ, नवनाथ रामचंद्र पोळ, रमेश रावबा उमराटकर ,कृष्णा विठ्ठल पोळ ,अनिल चंद्र दिखे ,भिमाजी शंकर पोळ गोपाळ, गोविंद पोळ हे सदस्य उपस्थित होते सदर सदस्य हे सह्याद्री सर्च अँड रेस्क्यू फोर्स भोर अध्यक्ष सचिन सदाशिव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे.