वाई प्रतिनिधी
सोमवार दि.23 रोजी कोल्हापूर येथे झालेल्या शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत महेश रवींद्र तेलतुंबडे याचा इपी या प्रकारात प्रथम क्रमांक आला आहे. तर फाईल या प्रकारात द्वितीय क्रमांक आला आहे.नंदुरबार मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धसाठी त्याची निवड झाली आहे महेश हा किसनवीर महाविद्यालय वाई येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे. महेश हा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांचा मुलगा आहे. शालेय जीवनापासून त्याला खेळाची आवड असल्यामुळे अनेक खेळांमध्ये त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे असेही त्याच्या वडिलांनी सांगितले. प्रफुल्ल जगताप, सागर मगरे, उदय डोंगरे( उपाध्यक्ष तलवारबाजी संघटना ) हे त्याचे या क्रीडा प्रकारातील गुरु आहेत.
त्याचे कोच प्रफुल्ल जगताप यांनी सांगितले महेश तलवारबाजी मधील राष्ट्रीय खेळाडू आहे. खेलो इंडिया खेलो यामध्ये त्याने उत्तम अशी कामगिरी केली आहे. तो रोज चार तलवारबाजी साठी कठीण मेहनत घेत असतो. ऑलम्पिक तसेच एशियन गेम्स मध्ये तो भारतासाठी खेळून सुवर्णपदक आणेल असा विश्वास वाटतो. घरच्याची उत्तम साथ, जिद्द, मेहनत व कठीण परिश्रमाच्या जोरावर त्याने हे यश खेचून आणले आहे असेही ते पुढे म्हणाले. .