अर्पिता गायकवाड / वाई प्रतिनिधी
अमरावती येथे झालेल्या शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत अनिकेत गावडे – प्रथम, ज्ञानेश्वरी देसाई- प्रथम व कार्तिकी गायकवाड -हिने द्वितीय क्रमांक मिळविला असून या खेळाडूंची गुजरात येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. तसेच चंद्रपूर येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत शुभम इथापे, आर्यन किरवे ,रोहित मांढरे, पार्श्व कुपाडे ,वैभव बोडरे व साहिल सपकाळ यांनी अनुक्रमे 4X100mt. रिले धावणे स्पर्धेत प्रथम व 4X400mt. रिले धावणे द्वितीय क्रंमाक मिळविला पैकी शुभम इथापे याने वैयक्तिक 400 मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला असून त्याची शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे व पार्श्व कुपाडे याने वैयक्तिक 400 मीटर हर्डल्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय शालेय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेत सृष्टी जाधव – ईप्पी – प्रथम व फॉईल -द्वितीय, नूतन वरखडे -सेबर- प्रथम, भूषण वरखडे -फॉईल – प्रथम व ईपी -द्वितीय, महेश तेलतुबंडे -ईप्पी – प्रथम व फॉईल – द्वितीय, शंभूराज फणसे – फाईल- तृतीय ,अथर्व वरखडे -ईप्पी – तृतीय क्रंमाक मिळविला वरील तलवारबाजी खेळाडूंची गोंदिया या ठिकाणी होणाऱ्या शालेय राज्यस्तर स्पर्धेकरिता निवड झाली आहे तसेच अमरावती येथे झालेल्या राज्यस्तर शालेय वुशु क्रीडा स्पर्धेत पारस बांदल याने चतुर्थ क्रमांक मिळवला.
या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते खेळाडू विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खेळाडूंना प्रा. जाधव एम. व्ही. प्रा. चव्हाण एस.टी. श्री प्रणित सुतार , श्री. राजगुरू कोचळे, श्री. प्रफुल्ल जगताप , श्री. वजीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे ,सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, विश्वस्त मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे , उपप्राचार्य विवेक सुपेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कोकरे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.