धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
भोर तालुक्यातील १३ ग्रामपंचायत मतदान शांततेत पार .
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ८३.५४ टक्के मतदान;माळेगाव मध्ये सर्वाधिक ९८.८८ टक्के तर शिरवली हिमा येथे सर्वाधिक कमी ७१.८५ टक्के मतदान .भोर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी आज (दि.५)शांततेत मतदान पार पडले असून एकूण १० हजार २९८ मतदारांपैकी८ हजार ५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्यातील माळेगाव येथे सर्वाधिक जास्त ९८.८८ टक्के मतदान झाले असून शिरवली हिमा येथे सर्वाधिक कमी ७१.८५ टक्के मतदान झाले आहे.तेरा सरपंचपदासाठी ४२ उमेदवार रिंगणात असून ३१ सदस्यांसाठी ४४ उमेदवार आपले नशीब आजमवणार आहेत.मोजणी उद्या (दि.६)नोव्हेंबर रोजी होणार आहे.गाव निहाय मतदान पुढील प्रमाणे दापकेघर ८९.४३,शिरवली हिमा ७१.८५ ,हिरडोशी ८८.२६ ,करंजे ७५.०७, वरोडी बु. ८६.३६,पळसोशी ७०.३३,नाटंबी ८४.३३,वडतुंबी ७४.४८,महुडे खुर्द ८४.२९,जयतपाड ९०.५२,कांबरे बु. ८४.५२,माझगाव ८४.५५,माळेगाव ९८.८८ टक्के.मतमोजणी उद्या (दि.६ नोव्हेंबर) रोजी होणार असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.