धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
ग्रामपंचायत वडतुंबी येथे सुवर्णा निगडे यांचा सरपंच पदासाठी प्रचंड बहुमताने विजय .
भोर तालुक्यातिल ग्रामपंचायत मतदान विजयी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीमध्ये नऊ महिला तर चार पुरुष गावकारभारी ठरले असून, भोर तालुक्यात रविवारी (दि. ५) चुरशीने झालेल्या १३ ग्रामपंचायतीच्या लढतीमध्ये ८३.५४ टक्के मतदान झाले होते. १० हजार २५८ पैकी ८ हजार ५७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (दि ६) औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी अॅड. सागर विलास रोकडे झाली. त्यामध्ये चापकेघर (सरपंच दुर्वा सुभाष केक) शिरवली हिमा (सरपंच नामदेव दगडू पोळ), हिडोशी (सरपंच बबन मालुसरे), करंजे (वैशाली योगेश कुडले), वरोडी बुक (अशोक जगन्नाथ तुपे, वरोडी खुर्द (शीतल संदीप भिलारे), पळसोशी (सुनीता तुकाराम म्हस्के), महुडे खुर्द (सोनाली कुमकर), जयत्पाड (सुजाता दिघे कांबरे बुद्रुक (मनीषा आंबळे), माझगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसच्या विचाराचे असल्याचा दावा पक्षाने केला आहे. तर, वडतुंबी (सुवर्णा निगडे), नाटंबी धुरळा ग्रामपंचायत निकाल भोर तालुका (विशाल खोपडे) व माळेगाव (कल्याणी मोरे) मध्ये इतर पक्षाची सत्ता आल्याचे समोर येत आहे. मतमोजणीनंतर उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून शिवतीर्थ चौपाटी येथे जल्लोष व्यक्त करण्यात आला .