धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
भोरमध्ये भव्य रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकासाठी दिल्या शुभेच्छा
भोर तालुक्यातील वेताळपेठ येथील हनुमान मित्र मंडळातर्फे आज दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले , हे दीपोउत्सव हनुमान मंदिर तसेच मंदिर परिसर येथे साजरा करण्यात आला त्यावेळी मंदिर स्वच्छ केले व परिसर मध्ये तसेच मंदिरामध्ये फुलांनी सजावट केली , दिपोउत्सवामुळे हजारो दिवे लावून दिपोत्सव साजरा केला तसेच हनुमान मंदिर समोरील परिसरामध्ये नेत्रदीपक रांगोळी काढण्यात आली , रांगोळीच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी निलेश घोणे, श्रीमान कांबळे, कुणाल कांबळे, लोकेश घोणे, समीर घोणे, ऋषिकेश निकुडे, आदित्य घोणे, स्वप्निल घोणे, दुर्गेश घोणे, पंकज निकुडे, सागर कांबळे, राकेश निकुडे, विनय पलंगे इत्यादी उपस्थित होते.