प्रतिनिधी शिवाजी भोसले
फलटण.सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे अनेक फिरस्ती लोक हे गावांमध्ये येऊन राहत आहेत. याबाबत खरंतर महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे पोलीस पाटील कोतवाल बीट अंमलदार यांनी सदर टोळ्यांची माहिती ठेवणे गरजेचे आहे. परंतु कामाचे स्वरूप वाढल्याने त्याकडे विशेष कोणी लक्ष देत नाही पण तरीसुद्धा आता आधुनिक तंत्रज्ञान आल्याने सर्व ग्रामपंचायतींना फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सर्व फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत यांनी सर्वांनी सीसीटीव्ही गावात राजकीय मतभेद बाजूला ठेवून चांगल्या क्वालिटीचे बसवून घ्यावे व गावात येणारे संपूर्ण रस्ते त्यावर कव्हर करावेत असे नम्र आवाहन करण्यात आले सदर सीसीटीव्ही बसवल्याने महिलाविषयक होणारे गुन्हे कमी होऊ शकतात तसेच आपले आई वडील कामाला गेल्यानंतर गावातील लहान मुले सुरक्षित राहू शकतात गावात होणाऱ्या लहान मोठ्या चोऱ्यांना आळा बसू शकतो गावात होणाऱ्या गंभीर घटनांबाबत चाप बसू शकतो त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे