वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ओझर्डे गावात असलेल्या विद्युत ट्रांसफार्मर मधील १०० किलो तांब्याची तार अज्ञात चोरट्याने केली लंपास या प्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १० रोजी ११ वा. ते दि. १२ रोजी १२:४५ वा. सुमारास ( नक्की वेळ माहित नाही ) ओझर्डे गावच्या हद्दीत कॅनल नंबर १ वरील अरुण गायकवाड यांच्या शिव नावाच्या शिवारालगतच्या गट नंबर. ३७० मधील व ओझर्डे कॅनल नंबर १ रितेश ढेरे यांच्या माळ नावाच्या शिवारातील गट क्र. ३८४ मधील विद्युत ट्रांसफार्मर मधील १०० किलो तांब्याच्या तारा अंदाजे किंमत चाळीस हजार रुपये इतका कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे व ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल खाली सांडून नुकसान केले आहे म्हणून त्या अज्ञात चोरट्याच्या विरोधात आशिष गोपाळ कृष्णन प्रधान तंत्रज्ञ यांनी भुईंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास एएसआय टकले करत आहेत.