ज्योती जगताप / वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यात मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर शनीवार दि. १८ रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. यावेळी वाई तालुक्यातील लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या सभेला उपस्थित राहणार आहे त्यामुळे ही सभा ऐतिहासिक व विराट होणार असल्याची माहिती मिळत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी वाई येथील सभेच्या स्थळाची पाहणी केली तसेच पार्किंग व्यवस्था याची देखील पाहणी केली. यावेळी सकल मराठा क्रांती मोर्चा आंदोलन समन्वयक व वाई पोलीस विभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम, वाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे व भुईंज पोलीस ठाण्याचे एपीआय रमेश गर्जे यांच्याशी अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली वाई तालुका हा मोठा असल्याने येथे मराठा समाज भरपूर आहे त्यामुळे आंदोलनाला येणाऱ्या समाज बांधवांसाठी अल्प आहार, पाणी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये याच्यासाठी पोलिस प्रशासन व आंदोलन समन्वयक यांनी काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले सभा श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज चौक सार्वजनिक बांधकाम विभाग समोर व तहसील कार्यालय वाई येथे होणार असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही याची देखील काळजी घेण्यास सांगितले कोणताही अनुचित प्रकार न घडता ही सभा मोठ्या उत्साहात पार पडावी असे सांगण्यात आले.
या सभेची जय्यत तयारी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे. वाई शहरात ठीक ठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. तसेच भगवे ध्वजही लावण्यात आलेले आहेत.