खंडाळा
विजेच्या खांबावर चडून शॉक लागल्यामुळे जखमी झालेल्या एकावर शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ता.८ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० वा. चे सुमारास मौजे विंग, ता. खंडाळा गावचे हद्दीत रिएटर कंपनी समोर असलेल्या २२ के व्ही.इलेक्ट्रीक लाईनचे खांबावर शकुंतला केबल नेटवर्कचे मालक ज्ञानेश्वर बांदल रा.भोर व विश्वास नारायण मालुसरे, रा. महाळवडी यांना चालू ईलेक्ट्रीक खांबावर चढणे व कोणतेही अनाधिकृत काम करणे, हाताळणे, त्यास छेडछाड करणे हे जिवितास धोक्याचे आहे, हे माहीत असताना सुद्धा त्यांनी हयगयीचे, निष्काळजीपणाचे वर्तन करुन विश्वास मालुसरे हा रिएटर कंपनी समोर असलेल्या
२२ कें व्हीं इलेक्ट्रीक लाईनचे खांबावर चडुन शकुंतला नेटवर्कची केबल बांधत असताना त्याचा चालु लाईनला स्पर्श
झालेने त्यास शाँक लागुन तो खांबावरुन शेजारी असलेल्या तळेकर यांचे हाँटेलच्य पत्र्यावर पडला होता .व तेथुन खाली पडुन तो स्वत:चे किरकोळ व गंभीर दुखापतीस कारणीभुत झाला आहे. म्हणुन वैभव भोसले सहाय्यक अभियंता यांनी त्याचेविरुद्ध शिरवळ पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहेत.