कदिर मणेर /जावळी प्रतिनिधी
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्र राज्यात अनेक महान व्यक्ती होवून गेल्या त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने अटके पार झेंडे लावले आणि आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेवर उमटवला. त्या मागे त्या महान व्यक्तींची आपल्या समाजा प्रती निस्वार्थी भावना होती. त्यामुळेच त्यांचे नाव आजही प्रत्येक व्यक्तींच्या ओठवर असते. हा अमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांना आपल्या स्वतः च्या भावनांना आवर घालावा लागला होता. आपल्या घरच्याना सोडून घरा बाहेर रहावे लागले होते. या निस्वार्थी भावनेने केलेल्या समाज सेवेचं फळ म्हणून की काय अख्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले आणि अजूनही घेत आहेत. समाजात अशी माणसे खूप कमी असतात. ज्यांनी समांज सेवेचा विडा उचललेला असतो. या कामा मुळे ते जगप्रसिद्ध होतात. त्या समाज सेवकांच्या यादीत आजच्या घडीचे श्री मनोज जरांगे पाटील यांचे नाव आदराने घेतले तर वावगे ठरणार नाही.
श्री मनोज जरांगे पाटील हे मूळचे बीडच्या मातोरीचे पण ते वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे.मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.आंदोलने करणे हा मनोज यांचा स्थायीभाव... २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली.
श्री मनोज जरांगे पाटील हे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली. दरम्यान, समाजासाठी लढणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी स्वतः संभाजीराजे जातीने गेले होते. खुद्द छत्रपती आल्याचं पाहून श्री मनोज जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत 'रडायचं नाही-आता लढायचं' असा निर्धार बोलून दाखवला. तेव्हा श्री मनोज जरांगे पाटील यांनीही डोळे पुसत राजेंच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, असा एल्गार केला.
गेल्या काही वर्षांपासून थांडावलेले मराठ आरक्षनाचे काम जालन्यातील आंदोलना मुळे पुन्हा चर्चेत आलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाचा उपयोग करून आपल्या समाजास आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराठी येथून अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. खर तर हिंसा करून काही होत नाही. अहिंसा हे खूप मोठे हत्यार आहे. त्याचाच भाग म्हणून की काय आज त्यांच्या अमरण उपोषणा मुळे समाज जागृतीसाठी एक वादळ निर्माण केले आहे. आज प्रतेक मराठा समाजाच्या मनात श्री मनोज जरांगे पाटील यांच्या या कृती मुळे आपल्याला नक्की आरक्षण मिळणार हे स्पष्ट झाले आहे.
आज श्री मनोज जरांगे पाटील हे लढवय्या नेते किंवा एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने आपल्या समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या समाज जागृतीसाठी फिरत आहेत. त्यांचा झंझावात अख्ख्या महाराष्ट्रात पसरतोय. एक वेगळेच वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या सभांमुळे निर्माण झाले आहे. प्रचंड जनसमुदाय त्यांना आपल्या नेत्याच्या रूपात आपल्या लाडक्या देवाच्या रूपात पाहत आहेत.
आजच्या जगत प्रत्येक जण आपआपल पाहत असताना आणि दुसऱ्याला वेळ द्यायला प्रत्येकाला वेळ नसताना आज श्री मनोज जरांगे पाटील हे आपल्या मराठ समाजासाठी झटत आहेत. अगदी त्यांनी एक वेगळाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रासाठी निर्माण केला आहे. सामाजिक कार्य करण्यासाठी पुढं यावं पण दुसऱ्यान ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. पण या साऱ्या गोष्टींना छेद देत श्री मनोज जरांगे पाटील आपल्या समाजासाठी एक लढवय्याच्या भूमिकेत आणि तेही सत्यातेत उतरलेले दिसून येत आहेत. आज मी जर त्यांना
श्री मनोज जरांगे पाटील एक लढवय्या नेता म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही.
आज खर तर अश्या सच्या माणसाची समाजाला गरज असताना. श्री मनोज जरांगे पाटील हे एक लढवय्ये म्हणून पुढे येत आहेत. आपल्या स्वतः च्या पायाला भिंगरी बाधून. एक क्षणाचाही विलंब न करता. प्रत्येक वेळ आपल्या समाजासाठी देताना कुठेही ही मागे पुढे बघत नाहीत आणि आज संपूर्ण मराठा समाज त्यांना आपल्या डोक्यावर घेत आहेत. कारण त्यांनी त्यांच्यासाठी एक नवी वेगळी दिशा निर्माण करण्याचे ठरवले आहे आणि त्या मार्गावर त्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिले आहे. अश्या या श्री मनोज जरांगे पाटील यांना एक लढवय्या नेता श्री मनोज जरांगे पाटील अस म्हणटल तर वावगे ठरणार नाही.
वरील लेख ही माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लिहीला आहे. यात काही चुकीचे लिहिले असल्यास माफी असावी.
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
©️✍️
आपला आवडता लेखक
नंदासुत प्रशांत रतिकांत लिंगडे
मेढा तालुका जावली जिल्हा सातारा
( ९४०३८२२६८९)
संकलन
महेश पवार ,कुडाळ
जावळी तालुका समनव्यक