वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील पसरणी घाटात दत्त मंदिर येथे पाचगणी हुन वाईकडे येणाऱ्या डंपरचा अपघात शुक्रवारी सायंकाळी झाला. डंपर चालकाचा स्टेरिंगवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असून या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यत झाली नव्हती. याबाबत मिळालेली माहिती अशी की सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने पाचगणी, महाबळेश्वर ला वाई हुन मोठ्या प्रमाणावर पसरणी घाटातून वाहतूक सुरू आहे. गर्दीचा महापूर पसरणी घाटात असून शुक्रवारी सायंकाळी पाचगणी हुन वाईच्या दिशेला निघालेला डंपरच्या चालकाचा दत्त मंदिरच्या ताबा सुटला सुदैवाने डंपर हा कठड्यावर आदळून तेथेच थटला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून याची नोंद वाई पोलिसात झाली नव्हती.