वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील अनवडी गावच्या हद्दीत अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली याप्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दि. १६ रोजी ९:३० वा. सुमारास अनवडी गावच्या हद्दीत जोशीविहीर च्या थोडे पुढे सातारा ते पुणे जाणाऱ्या रोडवर प्रवीण जाधव व संजय जाधव यांच्या मोटरसायकलचा अपघात झाला नंतर त्यांना कवठे येथे उपचारास पाठवण्यात आले. प्रवीण यास डॉक्टर यांनी तपासले असता तो मयत झाल्याचे आढळून आले म्हणून सदर मयातेचा तपास व्हावा म्हणून मधुकर जाधव यांनी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे याचा अधिक तपास भुईंज पोलिस करत आहेत.