वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात आलेली आहे तर जुन्या कार्यकर्त्यांचाही मान राखण्यात आलेला आहे. वाई तालुका अध्यक्षपदी दीपक ननावरे आणि वाई शहराध्यक्षपदी विजय ढेकाणे यांची निवड तर वाई चिटणीस पदी जेष्ठ कार्यकर्ते काशिनाथ शेलार, राकेश फुले यांची निवड करण्यात आली. यामध्ये फुलेनगर गावचे तेजस जमदाडे यांची कामगार मोर्चा जिल्हाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. वाई तालुक्यातील अजय मांढरे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, सुरभी भोसले यांची महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपच्या पदाधिकारी निवडी करण्यासाठी भाजपचे प्रभारी माजी खासदार अमर साबळे यांनी मुलाखती घेतल्या होत्या. त्या मुलाखतीमध्ये अनेक मान्यवरांनी मुलाखती दिल्या होत्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी रविवारी दुपारी निवडी जाहीर केल्या. या निवडी बाबत वाई तालुक्यातील ज्येष्ठ व सर्वच पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्ते अभिनंदन केले आहे.