धनाजी पवार / निवासी संपादक / पुणे प्रतिनिधी
श्री नागेश्वर विद्यालय अंबवडे येथे स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.
अंबवडे, ता. भोर,जि पुणे येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, श्री नागेश्वर विद्यालय अंबवडे इथे एस एस सी १९९५ / १९९६ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक थोपटे सर हे होते. तसेच याप्रसंगी राजा रघुनाथराव विद्यालयाचे कलाशिक्षक निकम व्ही. एस.व या विद्यालयाचे लिपिक वाळंजकर हे उपस्थित होते. सर्वप्रथम शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सर्व माजी विद्यार्थ्यांनी गुरुजनांसहित विद्यालयाच्या सभागृहात प्रवेश केला. सरस्वती पूजनाने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. डॉक्टर बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमापूजन झाले. नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष थोपटे सर यांचा सन्मान करण्यात आला तसेच निकम सर व वाळंजकर सर यांनाही सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या बॅच मधील अकाली निधन झालेल्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचा फेटा, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष थोपटे सर यांनी विद्यालयात सुरू असलेल्या विकास कामांची व उपक्रमांची माहिती दिली व विद्यालयाची यशस्वी परंपरा सांगितली. त्यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक जण भाऊक झाले होते. तब्बल २७ वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. त्यानंतर सर्वांसाठी रुचकर स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. स्नेह भोजनानंतर हा आनंददायी क्षण कॅमेरात कैद करण्यासाठी मनसोक्त फोटोसेशन करण्यात आले. शेवटी सर्वांनी पुन्हा भेटण्याचे वचन देत एकमेकांना जड अंतकरणाने निरोप दिला. या स्नेहाच्या आयोजनासाठी उमेश जेधे, संदीप रांजणे, हनुमंत दूरकर, वैशाली बागल कृष्णा जाधव, अशोक देवघरे, संतोष खोपडे , सचिन खोपडे , संजय चिकणे , आजय राजीवडे
उदय वनकुंद्रे तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत दूरकर, संपत दुरकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन उमेश जेधे यांनी केले .