चित्रा फरांदे / वाई प्रतिनिधी
स्नेहमेळावा म्हंटले कि आपल्या जुन्या आठवणीना उजाळा देण्याचं हक्काचं व्यासपीठ, शालेय जीवनात शिक्षण घेत असताना मित्र मैत्रीण तसेच शिक्षकांच्या सहवासात आपण काय शिकलो तसेच भविष्यासाठी साठवून ठेवलेल्या आठवणी तुन सर्वांनी नेहमीच एकत्र आले पाहिजे याचा विचार करून माजी विद्यार्थी यांनी दिवाळी च्या सुट्टीत बावीस वर्षांनी पुन्हा एकत्र येऊन समाज उपयोगी कार्य करण्याचा निर्णय घेत शाळेप्रति ऋण व्यक्त करीत पुन्हा पुन्हा भेटण्याचा निर्णय घेत,भुईंज येथे २००१ च्या वर्गातील माजी विद्यार्थीनी साजरा केला स्नेहमेळावा.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज ता. वाई येथील २००१ वर्षातील दहावीच्या वर्गातील विद्यार्थी यांनी एकत्र येत दिवाळीच्या सुट्टी मधे स्नेहमेळाव्याचे शाळेमधेंच आयोजन केले, तब्बल बावीस वर्षांनी भेट होत असल्याने सर्वाना याची ओढ लागली होती, व्यस्त जीवनातून देखील शालेय मित्र मैत्रीण भेटल्याने सर्वाना आनंद तर झालाच सोबत सहकारी मित्र मैत्रीणच्या अडचणी च्या काळात पाठीशी राहून मदत करण्याचं सर्वांनी ठरविले यावेळी प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली यावेळी डॉ. अश्विनी बदादे, प्रा. वैभव पवार यांनी कविता सादर केली,तसेच प्रत्येकाने आपण शाळा सोडल्यानंतर काय केले याबाबत मनोगत व्यक्त केले,
याप्रसंगी आपल्याच वर्गातील यशस्वी झालेल्या सहकारी मित्र मैत्रीण यांचा गौरव केला तसेच ज्या वर्गात बसून शिक्षणाचे धडे घेतले त्याच ठिकाणी बसून या आठवणीची शिदोरी घेत पुढील वर्षी भेटण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त करीत या शाळेकरीता उपयोगी पडणारी वस्तू भेट स्वरूपात दिली, स्नेहमेळाव्याच्या करीता सचिन सूर्यवंशी, प्रमोद शेवते, प्रशांत शिर्के, रंजना लोखंडे,प्रफुल्ल आनंदे,नीलम पवार,वैभव पवार,डॉ अश्विनी बदादे, सीमा लोखंडे, रेश्मा भोसले यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन मयुरी पिसाळ यांनी केले
चौकट:-
सुरेंद्र इथापे घेणार गरजू विद्यार्थी दत्तक
२००१ वर्गातील माजी विद्यार्थी सुरेंद्र इथापे याने या शाळेत पाचवी करीता प्रवेश घेणाऱ्या दोन विद्यार्थी दत्तक घेणार असून त्यांचा पाचवी ते दहावी पर्यन्त चा सर्व शालेय खर्चाची जबाबदारी घेणार असून याबद्दल त्याचे स्कुल कमिटी तसेच सहकारी मित्रानी अभिनंदन केले