
गौरी जाधव
सातारा प्रतिनिधी
दऱ्याखोऱ्यात, घनदाट जंगलात रक्तात आणि भक्तीत तल्लीन असलेला शूरवीरांचा हा सातारा
महाराष्ट्रातील सातारा मराठ्यांची राजधानी म्हणून घेणारा असून त्याचे मोल आणि त्याची ऐतिहासिक वास्तु तेवढ्या मोलाचे आहे. पूर्वीपासून पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे हा विस्तारलेला सातारा 14 लक्ष किलोमीटर पसरलेला आहे. संत-महात्मे थोर व्यक्तिमत्व असलेले राजे युद्ध की असाच सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गोष्टींचा इतिहास या साताऱ्यात घडला घडवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सर्वात मोठ्या घडामोडी सातारा आणि पुणे याच परीसरात झाल्या.याच परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे 25 किल्ले स्थापन केले आयुष्यभर आदिलशहा आणि मुघल यांच्याशी लढा दिला एवढेच काय तर अफजलखानाचा कोथळा इथेच साताऱ्यातील असणाऱ्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काढण्यात आला. आम्हाला लाभलेल्या या ऐतिहासिक उंच घनदाट जंगलात, दऱ्याखोऱ्यात वेढलेल्या याच साताऱ्यात छत्रपतींचे गुरू श्री समर्थ रामदास स्वामी याच किल्ल्यांवर राहत होते.
सातारा हा जिल्हा शूरवीरांची भूमी या नावाने प्रसिद्ध आहे.या भूमीमध्ये कितीतरी संत महात्मे होऊन गेले.या भूमी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास घडला आहे. येथे अनेक किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याचा वेगवेगळा असा इतिहास आहे. त्यातील एक म्हणजे प्रतापगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्यात सर्वात मोठी लढाई झाली होती. प्रतापगड या किल्ल्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर तुळजाभवानी मातेचे मंदिर स्थापन केले.
अजिंक्यतारा हा एक किल्ला असून हा सातारा या शहरामध्येच आहे.हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला होता.साताऱ्यातील एक छोटस गाव अपशिंगे .या गावालाच अपशिंगे मिलिटरी गाव असे म्हंटले जाते.हे गाव छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळात देखील सैन्यात होते. सातारा जिल्ह्यातील अपशिंगे या गावातील प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती ही सैन्यात आहे.
सातारा जिल्ह्यातील माणसे साधी भोळी होती परंतु घनदाट जंगल व नद्यांनी संपन्न असल्याकारणामुळे येथे वन्य प्राण्यांचा राहावा मोठ्या प्रमाणात आहे या वन्य प्राण्यांच्या मुळे येथील लोक आपल्या जीवाची पर्वा न करता धाडसी व शुर होऊन एकत्र वसाहती करून राहू लागले. हळूहळू लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आल्याने वस्त्या व गावे निर्माण होऊ लागली मनुष्य हा सुधारत गेला वन्य प्राणी यांना मारण्यासाठी हळूहळू अवजारे निर्माण करू लागला. अशा अनेक कारणांचा मुळे मनुष्य धाडसी व शूर झालेला दिसून आला वन्यप्राणी मारणे व त्याचा अन्न म्हणून उपयोग करणे हा मुख्य प्रकारचे काम तो करत होता. मनुष्य जमात अत्यंत हुशार असल्यामुळे चांगल्या पद्धतीचे हत्यार प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरू लागला हळूहळू चांगल्या पद्धतीची घरे या जंगली व जास्त प्रमाणात झाडे असलेल्या जागेत होऊ लागल्याने सातारा जिल्ह्यातील तरुण हे उद्योग धंद्याच्या व देशाच्या सेवेसाठी जाऊ लागले.सातारा हा सहयाद्रीच्या कुशीत लपलेला एक जिल्हा आहे. सातारा जिल्हा हा मराठी राज्याची राजधानी होती.सातारा जिल्हाला शूरवीरांची भूमी असेही संबोधले जाते.या भूमीमध्ये संत ,राजे ,योद्धे, आणि थोर व्यक्तिमत्वांनी इतिहास घडविला आहे.
या जिल्ह्यात शिवाजी महाराजांनी अनेक किल्यावर विजय मिळवला आहे , त्यातीलच एक म्हणजे ‘वासोटा किल्ला’. कोयना नदीच्या परिसरात हा वासोटा किल्ला खुप जुना असून त्याला व्याघ्रगड असे म्हणतात. सातारा-कास-फळणी मार्गे वासोट्याला जाता येते. माघार घेणे आमच्या रक्तात नाही याच ध्येयाने थेट दुश्मनांच्या गोळ्या छातीवर घेतलेले कर्नल संतोष महाडीक पण याच साताऱ्यातील.
सातारा जिल्हयात सज्जनगड हा किल्ला आहे. सज्जनगड मध्ये रामदासस्वामी ची समाधी आहे. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू होते. सज्जनगड हा किल्ला मोगलांचा ताब्यात गेला तेव्हा त्याचे नैरससातारा नामकरण करण्यात आले .इ.स 1709 मध्ये मराठयांनी सज्जनगड किल्ला हा पुन्हा जिंकला.
पश्चिम भागातील सातारा जिल्हा हा मराठ्यांची राजधानी ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये छञपती शिवाजी महाराज यांचे सर्वात मोठे युद्ध सातारा जिल्ह्यामध्ये झाले होते.या जिल्ह्यातील युवक आणि युवती यांच्या मध्ये भरभरून देश प्रेम आहे, म्हणून
सातारा जिल्ह्यातील तरूण हे भारतीय सैन्य दलामध्ये जास्त प्रमाणात आहेत.सातारा जिल्ह्यामध्ये छञपती शिवाजी महाराज यांचा प्रतापगड हा किल्ला आहे. ज्या ठिकाणी अफजल खान आणि छञपती शिवाजी महाराज यांची भेट झाली. या भेटीमध्येही महाराजांनी अफजल खानाला खूप चांगला धडा शिकवला.जिल्ह्यातील प्रत्येकाच्या ह्रदयामध्ये देश प्रेम आहे. प्रत्येकाच्या जीवनात असे काही प्रसंग येतात तरीही सातारा जिल्ह्यातील माणूस मोठ्या हिंम्मतीने त्या अडचणीना सामोरे जातात. वेळीच एकमेकांच्या हाकेला धावून येतात. सातारकरांच्या बोली भाषेतूनच समजते,की सातारा जिल्ह्यातील माणूस आहे . त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची शूरता ,देशप्रेम दिसून येते. जिल्ह्यातील बरेच विर जवान देशासाठी शहीद झाले आहेत.सातारा जिल्ह्यामध्ये असे एक गाव त्या गावामध्ये प्रत्येक घरातील एक तरी व्यक्ती सैन्य दलांमध्ये आहे, त्या गावाचे नाव म्हणजे अपशिंगे होय.यामुळेच सातारा जिल्ह्याला शुर विरांचा सातारा असे म्हणतात.
सात डोंगराच्या मध्ये वसलेला व नैसर्गिक सुंदरतेने नटलेला व ऐतिहासिक पार्श्वभूमी आसलेला असा शूरवीरांचा सातारा. सातारा जिल्हात अनेक संत महात्मे होऊन गेले. अनेक शूरवीर या मातीत जन्माला आले त्यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. सातारा जिल्हामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा देखील इतिहास पहायला मिळातो. अशी ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी आजूनही परंपरागत चालत आलेली पहायला मिळते. छत्रपती उदयनराजे भोसले व छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. त्यांनी अजूनही ऐतिहासिक वारसा जपत शिवकालीन वस्तूसंग्रालय उभारले आहे. सातारा जिल्हात एकच अजिंक्य तारा हा किल्ला आहे. शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने समृद्ध झालेली भुमी म्हणजे सातारा जिल्हा..
मला आलेला अनुभव सांगतो आज आम्ही उन्हाळ्यामध्ये रानात झोपायला जातो त्या काळात घरी झोपले की गरम खूप होतं म्हणून रानात झोप चांगली लागते त्यामुळे आम्ही रानात झोपायला जातो आमचे जमीन नदीच्या कडेला असल्या कारणामुळे रात्रीच्या वेळेला रोज कोणी ना कोणी येते मासे पकडायला किंवा शिकारी हेतूने लोक येतात तसेच उन्हाळ्यात दिवसा ऊन जास्त असल्यामुळे रात्रीच्या वेळेला लोक आपले शेत जमीन भिजवत असतात तेव्हा अशा काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या की शेतकरी किंवा शिकारी करणारे किंवा मासे पकडणारे लोक हे आपल्याला जीवन जगायचं आहे या हेतूने रात्रीची कामे करतात तेव्हा असे समजले की आपल्या भागात देखील शूर्विर लोक आहेत मोठ्याप्रमाणात धाडस करून व जीव धोक्यात घालून रात्रीचे कामे करतात. असे भरपूर अनुभव आमच्या निदर्शनास आली. सातारा भागात नद्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे वृक्ष देखील मोठ्या प्रमाणात आहेत. कातकरी समाज भिल्ल समाज पारधी समाज असे अनेक समाज हे नदीच्या कडेला राहून आपले जीवन चांगल्या पद्धतीने जगत आहेत खरे पाहता हेच लोक निसर्ग टिकवण्याचे काम देखील करतात माझ्या बघण्यात अशा काही गोष्टी आल्या गावातील लोक नदीला कचरा टाकण्यासाठी येतात कचरा टाकल्यानंतर निघून देखील जातात परंतु हेच न शिकलेले लोक नदीतून कचरा काढून तो कचरा लांब घेऊन येतात व त्याची विल्हेवाट लावतात अशा वेळेस असे वाटते की हे लोक शिकलेले नसून देखील चांगल्या प्रकारची कामे करून ठेवतात शिकलेले लोक हे कचरा व निसर्गाला त्रास देतात अशा प्रकारची कामे करतात न शिकलेल्या धाडसी व शूर लोकांच्यासाठी मानाचा मुजरा अनेक लुप्त झालेल्या शस्त्रबाजी कलाबजी हे सातारा जिल्ह्यातील लोकांच्या मध्ये अजून देखील पहावयास मिळतात तसे पाहता सातारा जिल्हा शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
सातारा जिल्हा सातारा हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हात कृष्णा नदी व त्याच्या उपनदी, वेण्णा यांच्या संगमाजवळ स्थित एक शहर आहे. हे शहर १६ व्या स्थापित झाले होते आणि ते छत्रपति शाहू महाराज या सातारा च्या राजाचे स्थान होते. हे सातारा तहसिल तसेच सातारा जिल्हा यांचे मुख्यालय आहे. त्यामुळे शूरवीरांचा जिल्हा अशी ओळख ह्या सातारा जिल्हाने निर्माण केली आहे.