
चित्रा फरांदे / सातारा प्रतिनिधी
किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडली जुन्या काळातील तिजोरी राजे शिव छत्रपती परिवारातील मावळे किल्ले अजिंक्यतारा येथील स्वच्छता करत असताना एक दगडी चौथरा सापडला त्या चौथऱ्यावर ब्रिटिश कालीन एक जुनी लोखंडी तिजोरी आढळून आली राजे शिवछत्रपती परिवार महाराष्ट्रभर २२ जिल्ह्यांच्या मध्ये अनेक गड दुर्गांवर स्वच्छता मोहीम राबवतात किल्ले अजिंक्यतारा येथे कोरोना चे सर्व नियम पाळून स्वच्छता मोहीम चालू होती. तेव्हा तेथे त्या मावळ्यांना छत्रपती चा ठेवा असलेला चौथरा आढळून आला व तेथेच एक चौकोनी आकाराची लोखंडी भारदस्त तिजोरी बंद असलेली आढळून आलेली आहे मावळ्यांच्या म्हणण्यानुसार ही ब्रिटिशकालीन तिजोरी असावी सातारा मधील सर्व नागरिकांनी अजिंक्यताराचे अस्तित्व पुन्हा जिवंत करण्यासाठी लोकांनी हळूहळू या गडाच्या डागडुजी व स्वच्छता चालू केलेली आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जपणे देखील आपले कर्तव्य आहे या भावनेतून मावळे कार्य करत आहे. तसेच अनेक लोकांनी किंवा अनेक अनेक मावळे एकत्र येऊन या गडांची स्वच्छता डागडुजी करावी व ह्या गडांना पुन्हा जिवंत करावे अशी मागणी राजे शिवछत्रपती परिवाराचे सातारा जिल्हा अध्यक्ष विशाल शिंदे यांनी आवाहन केले आहे.