घर चुकलेल्या बाबांना यशोधन ट्रस्टने पुन्हा दाखवले आपले घर
शिवानी फरांदे / वाई प्रतिनिधी
वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्ट चे काम अत्यंत उत्कृष्ट आहे ट्रस्टच्या माध्यमातून अनेक बेघरांना तिथे आपलेपणाची जाणीव होते यशोधन ट्रस्ट ही अनेक पुरुष असो किंवा महिलांच्यासाठी आपले घर आहे चुकलेल्या लोकांना पुन्हा सुखरूप आपल्या घरी या ट्रस्टच्या माध्यमातून लावण्यात येते अलीकडेच एका घर चुकलेल्या बाबानां नातेवाईकांचा शाेध घेऊन त्यांना नातेवाईक मिळवुन दिले वयाेवृध्द, एका डाेळ्याने अंध, कानाने बहिरे, व्यावस्थित बाेलता येईना त्यात घर चुकले.पाेलिसांनी यशोधन ट्रस्टकडे पाठवले.15 दिवस येथे राहिले. त्या वृद्ध बाबांचा सोशल मिडिया वरती त्यांचा फाेटाे शेअर केल्या नंतर
दि.१० ऑक्टोंबर रोजी कराड या ठिकाणी त्यांच्या नातेवाईकांचा शाेध लागला आणि बाबा सुखरुप घरि गेले यशाेधन च्या माध्यमातुन निराधारांना सांभाळने, नातेवाईक शाेधुन घेणे, सुखरुप घरि सोडणे, अशी कामे ट्रस्ट मार्फत केली जातात. यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी सांगितले हे सर्व कामे करताना खूप आर्थिक खर्च येत आहे.
महिन्याचा 3 लाख खर्च होत आहे समाजातुन मदत होते परंतु ती पुरेशी नाही, त्यामध्ये आता दिवाळी आली या निराधारांची ही दिवाळी व्हावी अशी अपेक्षा आहे यासाठी लोकांनी आर्थिक मदत करावी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन यशोधन ट्रस्टचे संस्थापक रवी बोडके यांनी केले.