यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड मध्ये ,”व्यक्तिमत्व विकास” यावर व्याख्यान
अर्पिता गायकवाड / वाई प्रतिनिधी
दि.17/10/2022 पाचवड : महाविद्यालयातील इंग्रजी विभाग व स्त्री अभ्यास केंद्र यांच्या वतीने ,”व्यक्तिमत्व विकास” यावर मा. डॉ. व्ही. के. ओतारी , IQAC Coordinator, विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर यांनी व्याख्यान दिले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास कोणत्या पद्धतीने केला पाहिजे तसेच समाजातील ठळक व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींची उदाहरणे देऊन अभ्यासपूर्ण माहिती दिली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःचा व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी आत्मपरीक्षण करून गुण व दोष ओळखण्याची आवश्यकता आहे. स्वतःतील दोष कमी करून जीवनाचे ध्येय निश्चित करून त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या आवडीनुसार विविध कला, क्रीडा , कौशल्य यामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आवश्यक आहे. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. प्राचार्या. डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास करण्याच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच मा. प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांचा World Scientist and University Rankings, 2023 मध्ये उल्लेखनीय नोंद झाली याबद्दल त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सौ. गायकवाड आर. डी. यांनी केले .सूत्रसंचालन सौ .पवार डी. व्ही. यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार डॉ. पिंजारी व्हीं.जे. यांनी मानले. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. देशमुख आर.के., डॉ. मृणालिनी आहेर, डॉ.झेड . ए .कदम, डॉ. एस एम पवार, प्रा. गायकवाड डी.एस, डॉ. आर.एस. शिंदे, डॉ. विजया पाटील व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.