पांचगणी येथे एस पी समीर शेख यांचा अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका !
पांचगणी प्रतिनिधी/नौशाद सय्यद
सातारा जिल्ह्याचे नवनिर्वाचित एस पी समीर शेख यांच्यामुळे पांचगणी शहरांमध्ये अनेक दिवसांनी चाललेले अवैध धंदे यांना आळा बसलेला आहे. यापूर्वी असे वाटत होते की कायदा नुसताच बोलण्यासाठी व ऐकण्यासाठी उरलेला आहे.परंतू मा.एस पी साहेब समीर शेख जेव्हा पासून आपला कारभार सांभाळलेला आहे तेव्हा
पासून पाचगणी शहरांमध्ये अवैध धंदे पूर्णपणे बंद झालेले दिसत आहे .मा. एस पी साहेबांचे पाचगणी शहरांमध्ये भरपूर कौतुक होत आहे.त्यांची चर्चा देखील सर्वसामान्य जनतेमध्ये चांगली प्रतिक्रिया मानली जात आहे .भ्रष्टाचार व अवैध धंदे बंद झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्याबद्दल आदर निर्माण झालेला आहे .खास करून समीर शेख यांचा पाचगणी शहरांमधील नागरिक भरपूर प्रमाणामध्ये कौतुक करत आहे. पाचगणी शहरांमधून त्यांना चांगल्या कामाची शुभेच्छा असावी ही पाचगणी नागरिकांची इच्छा आहे अनेक लोक त्यांच्याशी गाठ घेण्याची व शुभकामना देण्याची मनापासून इच्छा व्यक्त करत आहे.