सातारा ! वाढे फाटा येथे बेछूट गोळीबार करून खुन केल्याचा गुन्हा उघड
मंगेश भोसले / सातारा प्रतिनिधी
दि.२४/०१/२०२३ रोजी रात्रि ००.३० वा. चे सुमारास वाढे गावचे हद्दीत पुणे कोल्हापूर रोडवर सर्व्हिस रोड लगत मयत अमित भोसले रा. शुक्रवारपेठ सातारा यांचेवर अज्ञात इसमांनी मोटार सायकवर येवून गोळीबार करून त्यांचा खुन केला.त्याबाबत फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरुन सातारा तालूका पोलीस ठाणे
गु.र.नं. ३२ / २०२३ भादविक ३०२, ५०६ (२), ३४ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३), १३५ गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात लक्षात घेवून
पोनि.अरुण देवकर यांनी त्यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकाने घटनास्थळावर चौकशी केली तसेच तांत्रिक पुराव्यांचा शोध
घेवून मयताच्या कुटूंबाकडे व इतर साक्षिदार यांचेकडे चौकशी केली असता ६ आरोपी निष्पन्न केले त्यामधील १ विधी संघर्षग्रस्त बालक यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. नमुद आरोपींचे ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता ते गुन्हा घडलेपासुन फरार होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडले पासुन त्यांचा सातारा, पुणे, अहमदनगर,जळगाव,औरंगाबाद लातूर,अलिबाग, इंदौर, उज्जैन- राज्य मध्यप्रदेश अशा वेगवेगळया जिल्हयात तसेच गोवा राज्यात शोध घेतला. सपोनि रमेश गर्जे व पोउनि अमित पाटील यांची दोन स्वतंत्र पथके त्यांच्या मागावरच होती. दरम्यान त्यांचे वास्तव्य
असलेल्या वेगवेगळया ठिकाणी बातमीदार तयार करुन त्यांना पकडण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रयत्न केले. दरम्यान दि.३ फेब्रुवारी २०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत नमुद आरोपी हे गोवा येथे असल्याचे खात्रीलायक बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर यांना मिळाली नमुद आरोपी हे सराईत असल्याने ते त्यांचे लोकेशन सातत्याने चेंज करीत असल्याने व स.पो.नि.रमेश गर्जे व तपास पथक गोवा येथे पोहोचण्यास
दोन तीन तासाचा अवधी होत असल्याने तातडीने हलचाल करण्यासाठी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरची माहिती निधीन वाल्सन, पोलीस अधीक्षक उत्तर गोवा यांच्या मदतीने ताब्यात घेतले. पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी मयताच्या पत्नीकडुन सुपारी घेवून सदरचा खुन केल्याचे सांगीतले. त्यानंतर
मयताची पत्नी तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन मयताच्या पत्नीकडे विचारपुस केली असता
तीने तीचा मयत पती हा बाहेरील स्त्रीयांशी अनैतिक संबंध ठेवुन तीला मारहान करीत होता म्हणुन तीनेच त्याच्या खुनाची सुपारी दिली असल्याचे सांगीतले आहे.
आरोपींची नावे-
१) अभिषेक विलास चतुर वय २७ वर्षे
२) शुभम हिंदुराव चतुर वय २७ वर्षे
३) राजू भिमराव पवार वय २६
४) सचिन रमेश चव्हाण वय २२ वर्षे
५) सुरज ज्ञानेश्वर कदम वय २७ वर्षे